Monday, October 02, 2017

तुम्ही काय करता?

तुम्ही काय करता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पैसे कशाचे मिळतात हे सांगून द्यायचं असतं हे कधी ठरलं असेल?

शाळा कॉलेजात "मोठं होऊन काय बनणार?" हा फेवरेट प्रश्न असायचा. त्या प्रकारातून बाहेर आलं की पुढच्या इयत्तेत हा प्रश्न असतो. तुम्ही काय करता?


या प्रश्नाचं असं उत्तर द्यायला काय हरकत आहे की

मी हसत असतो. दिवसातून अर्धा वेळ मी तेच करतो.
किंवा
मी पळतो. आता ८ तासाच्या ऑफिसपेक्षा सकाळच्या एक तासाच्या पळण्यात जास्ती मजा येत असेल तर का नाही?
किंवा
मी लिहितो. पुस्तकं बिस्तकं नाही. पण तरीही भरपूर लिहितो.
किंवा
मी गप्पा मारत असतो. माझी स्पेशालिटी आहे ती. कोणाशीही मी दिलखुलास बोलू शकतो.
किंवा
सध्या तरी यु ट्यूब बघतो. पण आता चेंज करेन म्हणतोय.
किंवा
मी ढोल वाजवतो
किंवा
मी नाच करतो
किंवा
मी बसतो कोडींग करत. त्यातच किक मिळते मला.
किंवा
मला शिकत रहायला आवडतं. आत्ताच मी भाज्या उगवायला शिकलो.


तुम्हाला काय करून आनंद मिळतो हे असंच असायला हवं हे. नसेल कोणाला आपला जॉब करून मजा येत तर कशाला बळच सांगायला लागो की अमक्या अमक्या ठिकाणी तमकं तमकं काम करतो. तसंही मला पैसे कुठून मिळतात ही माहिती शेअर करून कोणाला काय मजा? त्यापेक्षा मी ढोल वाजवतो म्हणण्यात केवढी मजा आहे. दर गणपतीमध्ये, दर उत्सवात जाऊन मी ढोल वाजवतो. है की नही? हे म्हणजे असं की ज्याचे किस्से सांगताना आणि ऐकताना सगळ्यांनाच मजा. उगाच दरवेळी मोघम प्रश्नाला निरर्थक उत्तराचा नैवैद्य दाखवायची जुनी प्रथा का कुरावळवी आणि त्यानं कोण प्रसन्न होणार?

तर... काय मग... तुम्ही काय करता?

No comments: